प्रति सर्व आपले सरकार सेवा केंद्र सेतू चालकाना महसूल विभागीय अधिकारी, कळवण्यात येते आहे कि फायनान्शियल इयर डेटा लाईव्ह सर्वर वरून टेप मध्ये संलग्न करण्याचे काम करण्यात येणार आहे,
त्यामुळे आपले जुने २०१९ - २२ पासून चे अर्ज आपल्या लॉगिन वर पेंडिंग असल्यास ते लवकरात लवकर निर्गमित करावे.
तसेच जुने अप्रूव्हल झालेले प्रमाण पत्र आपणास आपल्या लॉगिन मध्ये दिसणार नाही, कृपया आपण ते डाउनलोड करून जतन करावे किंवा
https://www.digilocker.gov.in/
पोर्टलवर सेव्ह करून ठेवावे जेणेकरून आपण या पुढे कधीही तेथून वापरासाठी उपयुक्त ठरेल. टेप मध्ये संलग्न केल्या नंतर हे अर्ज आपणास पोर्टल वर दिसणार नाहीत कृपया याची नोंद घ्यावी.
खुश खबर!!!
महाराष्ट्रातील सर्व महा-ई-सेवा केंद्र चालकांना सूचित करण्यात येत आहे की २ मार्च २०१५ रोजी, सांयकाळी ७ वाजल्यापासून नवीन पॅन कार्डसाठीची अर्ज प्रक्रिया आता ऑनलाईन करण्यात आली असून महा ई- सेवा केंद्रांच्या माध्यमातून आता व्ही-एल-ई ही सेवा प्रदान करू शकतात. या सेवेचा लाभ अधिकतम घ्यावा.
नागपूर विभागातील सर्व महा ई सेवा केंद्राचालकांना विशेष महत्वाची सूचना: माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन ह्यांच्या नवीन सुचने नुसार, पुढील साधारण एक महिन्यात सर्व केंद्र चालकांना महाऑनलाईन पोर्टल वर लॉगइन करण्या साठी बायोमेट्रिक डिव्हाइस अनिवार्य करण्यात येणार आहे. बायोमेट्रिक डिव्हाइसद्वारे केंद्र मालकाची ओळख पटविल्यानंतरच त्यांना महाऑनलाईन पोर्टल वर लॉगइन करता येईल. ह्या द्वारे सर्व केंद्र चालकांना सूचित करण्यात येत आहे की ज्या केंद्र चालकांकडे बायोमेट्रिक डिव्हाइस आहे, (जे ते आधार नोंदणी, फायनान्शियल इन्क्लुजन, अथवा इतर कुठल्याही प्रकल्पासाठी वापरत असतील, त्याची संपूर्ण माहिती त्यांनी त्वरित आपल्या जिल्हा समन्वक यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कडे द्यावी. सर्व माहिती ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखे पर्यंत देणे आवश्यक आहे.
सर्व VLE's ना कळविण्यात येते कि दि. ०७ मार्च २०१५ संध्याकाळ पासून राजपत्र करण्यासाठी नवीन दर आकारण्यात आले आहेत.
पुढील प्रमाणे : १. खुला प्रवर्ग शुल्क ५०० रु. + सेवा शुल्क २२.४७ रु.
२.मागासवर्गीयशुल्क२५०रु. + सेवा शुल्क २२.४७ रु.